हार्बर, ट्रान्स हार्बरचा प्रवास होणार वेगवान

हार्बर, ट्रान्स हार्बरचा प्रवास होणार वेगवान

हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांचा प्रवास वेगवान होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांचा प्रवास वेगवान होणार आहे. मध्य रेल्वेने हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही मार्गावरील लोकलची वेगमर्यादा ताशी ८० किमीवरून ताशी १०० किमी करण्यात येणार आहे.

सध्या सीएसएमटी - पनवेल लोकल प्रवासासाठी एक तास २० मिनिटे, तर, ठाणे - वाशी लोकल प्रवासासाठी ३० मिनिटे लागतात. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील वेगमर्यादा ताशी ८० किमीवरून १०० केल्याने प्रवाशांच्या प्रवासातील १० मिनिटे कमी होणार आहेत.

सीएसएमटी - टिळकनगर दरम्यानच्या दर दोन रेल्वे स्थानकांमधील अंतर १ ते २ किमी आहे. त्यामुळे प्रत्येक स्थानकात लोकल थांबवून पुन्हा वेग कमी-जास्त करावा लागतो. लोकलचा वक्तशीरपणा देखील वाढणार असून प्रवाशांचा प्रवास जलद होणार आहे, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com