Death Threats to Iron Man Hardik Patil
Death Threats to Iron Man Hardik PatilTeam Lokshahi

आयर्नमॅन हार्दिक पाटील यांना जीवे मारण्याच्या धमक्या

विरार येथील आयर्नमॅन हार्दिक पाटील यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. गेले तीन महिन्यांपासून पाटील यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.
Published by :
Vikrant Shinde

विरार येथील आयर्नमॅन हार्दिक पाटील यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. गेले तीन महिन्यांपासून पाटील यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यांच्या घरावरील पेट्रोल बॅाम्ब हल्ल्यातील मुख्य सूत्रधार, कट कारस्थान रचणाऱ्या आणि धमकी देणाऱ्या फरार तीन संशयित आरोपींना लवकरात लवकर पकडले जावे अशी मागणी पाटील यांनी पत्रकार परिषदेतून पाेलीस दलास केली आहे.

Death Threats to Iron Man Hardik Patil
"...तुम्ही राज्य चालवण्याच्या लायकीचेच नव्हता" प्रकाश महाजनांचा ठाकरेंवर घणाघात

आयर्नमॅन हार्दिक पाटील यांच्या निवासस्थानी 4 मे 2021 रोजी पेट्रोलचा बाँम्बचा मारा करण्यात आला होता. विरार पोलिसांनी या प्रकरणी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, कट कारस्थान रचणे या कलमानव्ये गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी आतापर्यंत 7 संशियत आरोपींना अटक केली आहे. यातील दोन संशियत आरोपींचा शाेध सुरु आहे.

कांचन ठाकूरला कोर्टाने अंतरिम जामीन दिला होता पण तो आता फेटाळल्याने या फरार संशयित आरोपीला अटक करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे. तसेच या प्रकरणाचे धागेदोरे भारतात नसलेले सनी उर्फ रोहन ठाकूर यांच्या पर्यंत पोहोचले असल्याने पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी केल्याची माहितीही त्यांनी दिली.

माझ्या जीवाचे भविष्यात काही बरे वाईट झाल्यास सनी ठाकूर व गुन्ह्यातील इतर आठ संशयित आरोपी जवाबदार असतील असे पाटील यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले. भारत देशाचे प्रतिनिधीत्व जगातील स्पर्धेत करत असून माझ्याच जीवाला धोका निर्माण झाला असताना फरार आरोपींना पकडण्याची मागणी करावी लागणे ही शोकांतिका असल्याचेही पाटील यांनी नमूद केले.

सनी यांच्या सांगण्यावरून मुंबईतील गोल्डन गॅंगचा सदस्य शैलेंद्र खोपडे हा मागील दोन ते तीन महिन्यापासून हार्दीकला व्हाट्सअप कॉलच्या माध्यमातून जीवे ठार मारण्याच्या धमक्या देत असल्याने याबाबतही विरार पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. याबाबत व्हाट्सअप कॉल रेकॉर्डिंग करून पुरावे कोर्टात आणि विरार पोलिसांना दिल्याचे पाटील यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com