'यंदा चुकीला माफी नाही'; हसन मुश्रीफांच्या समर्थकांचे स्टेटस

कागलमधील राजकारण पुन्हा तापल्याचे पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

कागलमधील राजकारण पुन्हा तापल्याचे पाहायला मिळत आहे. मंत्री हसन मुश्रीफ समर्थकांकडून यंदा चुकीला माफी नाही अशा आशयाचे स्टेटस सोशल मीडियावर ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

काल दुपारनंतर मुश्रीफ समर्थकांकडून हे सूचक स्टेटस ठेवले जात आहेत. त्यांच्या या स्टेटसमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com