Mediclaim : विमा कंपन्यांकडून आरोग्य विमा क्लेमसाठी 24 तासांची अट शिथिल

Mediclaim : विमा कंपन्यांकडून आरोग्य विमा क्लेमसाठी 24 तासांची अट शिथिल

विमा कंपन्यांकडून आरोग्य विमा क्लेमसाठी अटींमध्ये मोठा बदल
Published by :
Team Lokshahi
Published on

आपल्या आरोग्याशी संबंधित आरोग्य विमा काढल्यानंतर त्याचा दावा करण्यासाठी आपल्याला आता 24 तास हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायची गरज नाही. आता केवळ दोन तास ऍडमिट होऊनही हा दावा विमा कंपन्यांकडून मंजूर केला जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या धर्तीवर काही आरोग्य विमा कंपन्यांनी हा मोठा बदल केला असल्याचे सांगण्यात येत आहे.

आरोग्य विमा खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पूर्वी, विमा कंपन्या 24 तास किंवा त्याहून अधिक काळ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असण्याची अट ठेवत होत्या. मात्र आता ह्या अटींमध्ये शिथिलता आणत ती अट काही विमा कंपन्यांनी बदलली आहे. त्यामुळे आता काही विमा कंपन्यांच्या पॉलिसींमध्ये, दोन तासांपेक्षा जास्त हॉस्पिटलमध्ये ॲडमिट न झाल्यासही क्लेम मंजूर केला जाणार आहे. पूर्वी 24 तास हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणे बंधनकारक होते. मात्र आता आजारी पडल्यानंतर आरोग्य विमाचा दावा करण्यासाठी 24 तास रुग्णालयामध्ये राहण्याची गरज नाही फक्त दोन तासासाठी रुग्णालयात तुम्ही ऍडमिट असाल तरी तुमचा विमा मंजूर होणार आहे. वैद्यकीय तंत्रज्ञान हे आता अतिशय जलद आणि प्रगत झाल्यामुळे हा महत्त्वाचा बदल विमा कंपन्यांनी आपल्या अटींमध्ये केला आहे.

काही आरोग्य विमा योजनांमध्ये 2 तासांच्या हॉस्पिटलायझेशनचा आता समावेश करण्यात आला आहे . यामध्ये ICICI लोम्बार्ड एलिव्हेट प्लॅन, केअर - सुप्रीम प्लॅन आणि निवा बुपा - हेल्थ इन्शुरन्स प्लॅन यांचा समावेश आहे.पूर्वी अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी बराच वेळ लागत होता. मात्र आता मोतीबिंदू, केमोथेरपी, एनजीओग्राफी सारखे उपचार काही तासातच पूर्ण होतात त्यामुळे त्यांना रात्रभर रुग्णालयात थांबण्याची गरज नसते. मात्र रात्रभर न थांबल्यामुळे कोणत्याही पॉलिसीधारकाचा क्लेम अमान्य होऊ नये यासाठी ही नवीन पद्धत काही विमा कंपन्यांनी अमलात आणली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com