Ashwini Bidre Murder Case : शिक्षेवरील सुनावणी पुढे ढकलली; आता 'या' दिवशी येणार निर्णय
सहाय्याक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडाप्रकरणी आज, 11 एप्रिल रोजी पनवेल सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीत आरोपींना शिक्षा सुनावली जाणार होती. पंरतू, हत्याप्रकरणातील दोषींच्या शिक्षेवरील सुनावणी पुढे ढकलल्यात आली आहे. आता या प्रकरणी 21 एप्रिल रोजी सकाळी 11वाजता सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीत अश्विनी बिद्रे यांचे पती, मुलगी, वडील, भाऊ यांचे म्हणणे ऐकून घेतले गेले. तसेच हत्याकांडातील प्रमुख आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर, महेश पळणीकर, कुंदन भंडारी यांचेही म्हणणे न्यायाधिशांनी ऐकले.
11 एप्रिल 2016 मध्ये घडलेल्या या हत्याकांडाची सुनावणी अलिबाग आणि पनवेल सत्र न्यायालयात सुमारे 7 वर्षे सुरू होती. या खटल्यात न्यायालयाने सुमारे 80 साक्षीदार तपासले आहेत. या हत्याकांडातील प्रमुख आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरला न्यायालयाने दोषी ठरवले. कुरुंदकरसह 5 जणांना या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती.