दिल्ली कथित मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरण; अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी

दिल्ली कथित मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरण; अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी

दिल्ली कथित मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

दिल्ली कथित मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. सीबीआयने 26 जून रोजी तिहार जेलमधून केजरीवालांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे.

वकील रजत भारद्वाज यांनी कायद्याच्या योग्य प्रक्रियेचे पालन न करता केजरीवाल यांना बेकायदेशीर पद्धतीने ताब्यात घेतल्याचा दावा केला असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे जामीन याचिका दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.

अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर ५ जुलै रोजी सुनावणी होणार असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com