Manikrao Kokate : कोकाटेंच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी,आजच्या सुनावणीत कोकाटेंना दिलासा नाही

Manikrao Kokate : कोकाटेंच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी,आजच्या सुनावणीत कोकाटेंना दिलासा नाही

राज्याच्या राजकारणातील गमतीशीर प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्यासाठी आजची न्यायालयीन सुनावणी दिलासादायक ठरली नाही.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

राज्याच्या राजकारणातील गमतीशीर प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्यासाठी आजची न्यायालयीन सुनावणी दिलासादायक ठरली नाही. राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कोकाटे यांच्याविरोधात नाशिक सत्र न्यायालयाने जारी केलेल्या अटक वॉरंटनंतर त्यांनी न्यायालयात तातडीने सुनावणीसाठी अर्ज केला होता. मात्र न्यायाधिशांनी आज त्यांच्या याचिकेला नकार दिला.

कोकाटेंची अडचण वाढली

कोकाटे यांना न्यायालयीन कारवाईच्या आधी जामिनासाठी अर्ज केला होता, परंतु न्यायाधीशांनी तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्या अटक होण्याची शक्यता अद्याप कायम राहिली आहे.

पुढील सुनावणी शुक्रवारी

न्यायालयाने पुढील सुनावणी शुक्रवारी निश्चित केली आहे. त्या दिवशी कोकाटे यांच्या याचिकेवर पुन्हा निर्णय होईल. या सुनावणीच्या निकालानंतरच त्यांचे मंत्रिपद आणि आमदारकी यासंबंधी भविष्य स्पष्ट होईल.

राजकीय वर्तुळात उठले प्रश्न

राज्यातील राजकीय वर्तुळात आता कोकाटे प्रकरणावर मोठा फोकस आहे. अटक होण्याची शक्यता आणि आमदारकीवर असलेला प्रश्न राजकीय चर्चेला चालना देत आहे. विशेष म्हणजे, लोकप्रतिनिधी कायद्याच्या तरतुदीनुसार दोन वर्षांची शिक्षा झालेल्या व्यक्तीची आमदारकी तात्काळ रद्द होऊ शकते. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल मात्रिकराव कोकाटे यांच्या राजकीय भवितव्यासाठी निर्णायक ठरेल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com