ताज्या बातम्या
Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकणात 2 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असून पुढील २-३ दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचे सांगितले जात आहे.
तसेच सातारा जिल्ह्यातील पाटण, महाबळेश्वर तालुक्यामध्ये पावसाचा जोर कायम राहणार असून सतत दीड महिना पाऊस कोसळत असल्यामुळे शेतकऱ्यांची शेतीची कामंही खोळंबली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर या तालुक्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून जोर धरु लागली आहे. अनेक शेतकऱ्यांची पावसाळापूर्व मशागतीची कामं, तसेच पावसाळी घेतली जाणारी पिकं अद्याप घेतली नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. या परिसरात 5 हजार 153 मिलिमिटर पाऊस फक्त दीड महिन्यात झाला असल्याचे सांगितले जात आहे.