Maharashtra Rain Update : कोकणसह राज्यातील विविध भागात आज मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा 'रेड अलर्ट'

Maharashtra Rain Update : कोकणसह राज्यातील विविध भागात आज मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा 'रेड अलर्ट'

आजही कोकणसह महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
Published by :
Rashmi Mane
Published on

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं तडाखा लावला आहे. आजही कोकणसह महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचे सांगितले जात आहे. तर रायगड, पुणे, कोल्हापूर, नांदेड, लातूर, चंद्रपूर आणि नागपूरमध्ये मेघगर्जनेसह विजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज असून या जिल्ह्याना ओरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

तसेच कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि साताऱ्यातील काही भागात तुरळक पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. आज मान्सूनपूर्व पाऊस काही जिल्ह्यांमध्ये जोर धरण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com