Mumbai Rain
Mumbai Rain

मुंबई, ठाणे, रायगडला अवकाळी पावसानं झोडपलं! वादळी वाऱ्यामुळं घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळलं, ४ जणांचा मृत्यू

सोमवारी दुपारच्या सुमारास आभाळ भरुन आल्याने कल्याण-डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला.
Published by :

Mumbai Rain Viral Video : पावसाचा मोसमी हंगाम सुरु व्हायला काही दिवसांचा कालावधी उरला आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल घडत असल्यानं राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अशातच आज सोमवारी दुपारच्या सुमारास आभाळ भरुन आल्याने कल्याण-डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून लोकांना या पावसाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मुंबईत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्यानं घाटकोपरमध्ये हायवेजवळ असलेल्या पेट्रोलपंपावरील महाकाय होर्डिंग्ज कोसळलं. या होर्डिंगखाली जवळपास ८० गाड्या दबल्याची माहिती समोर येत आहे. तर या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाल्याचंही समजते आहे. तर या घटनेत अनेक जण जखमी झाल्याची माहितीही समोर आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. होर्डिंग कोसळल्याच्या घटनेची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या असल्याचं शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

ओव्हरहेड वायरचा खांब कोसळ्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर वडाळा येथे एका इमारतीजवळ पार्किग लिफ्ट कोसळल्याची घटनाही घडली. तसच रायगडमधील कर्जतमध्ये अवकाळी पावसानं धुमाकूळ घातल्यानं मतदान केंद्रांबाहेर पावासाचं पाणी साचलं. त्यामुळे मतदान करताना नागरिकांचे प्रचंड हाल झाले.

मुंबईत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्याने घाटकोपरच्या पूर्व द्रुतगती मार्गाजवळ असलेलं मोठं होर्डिंग्ज कोसळलं. अवकाळी पावसामुळं मुंबईसह जवळच्या परिसरात छोट्या मोठ्या अपघाताच्या घटनाही घडल्याचं समोर आलं आहे. सतत पाऊस सुरु असल्यानं वीज-पुरवठाही खंडीत झाला आहे. पावसाची संततधार सुरु असल्यानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com