Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा हाहाकार, पुढील 48 तास अत्यंत महत्वाचे
थोडक्यात
राज्यात अनेक भागात रेड अलर्ट जारी
पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाची असणार
मराठवाड्यात पावसाचा मोठा फटका बसलाय
राज्यात पावसाचा हाहाकार बघायला मिळत आहे. अनेक भागात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून शेतांचे रूपांतर तळ्यात झालंय. पूर्ण पिक वाहून गेले. पुरामध्ये शेतीमधील पिकच नाही तर धान्य कपडे आणि संसार वाहून गेला. शेतकऱ्यांचा हातात काहीच शिल्लक राहिले नाही. आभाळ फाटल्यासारखा पाऊस सुरू आहे. मराठवाड्यात पावसाचा मोठा फटका बसलाय. सरकारने मदत जाहीर केली असून यंत्रणा काम करत आहेत. मात्र, हा पाऊस अजूनही थांबण्याचे नाव घेत नाहीये. पुढील काही तास अजूनही धोक्याची असणार आहेत. उद्यापर्यंत संकट राज्यावर असणारच आहे.
आता भारतीय हवामान विभागाकडून उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाची असणार आहेत. येणाऱ्या 24 तासात मराठवाड्यातील पाऊस कमी होईल. मात्र, पाऊस पूर्ण बंद होणार नसल्याचे स्पष्ट हवामान विभागाने सांगितले. पावसाचा जोर अजूनही मराठवाड्यात बघायला मिळतोय. पाणी पातळीत सतत वाढत होताना दिसत आहे. मराठवाड्यात नागरिकांना सतर्कतेचा इशारा पुणे हवामान विभागाकडून देण्यात आलाय. राज्यात एवढ्या मोठया प्रमाणात पाऊस पडण्याचे कारणही हवामान शास्त्रज्ञ एस. डी सानप यांनी सांगितला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचे पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर पुढील 48 तास राहणार आहे. मराठवाड्यातील नद्या, नाले, ओढे तुडूंब भरून वाहत आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळतंय.
लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येतंय. यासोबतच या संकटाच्या काळात खाण्यापिण्याची व्यवस्था देखील करण्यात आलीये. धान्य किटचे वाटप देखील सुरू आहे. जालन्यातील सोमनाथ परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. खरिपातील सोयाबीन कपाशी पिकांमध्ये अजूनही पाणी साचून आहे. शेतात पाणी साचल्याने काढणीला आलेल्या सोयाबीनला शेतातच कोंब फुटण्याची शेतकऱ्यांना भीती. पंचनामे न करता ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची शेतकरी मागणी करताना सध्या दिसत आहेत. राज्यातील यंत्रणेचे सर्व गोष्टींवर बारीक लक्ष आहे.