Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीचा तडाखा; शेतपिके व फळबागांचे प्रचंड नुकसान
थोडक्यात
छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीमुळे शेती व फळबागांचे मोठे नुकसान
शेतकऱ्यांनी रस्त्यावर मोसंबी फेकून व्यक्त केला संताप
सरकारकडे वाढीव नुकसानभरपाई, कर्जमाफी व पिक विम्याची मागणी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीला मोठा फटका बसला. खरीप पिके तसेच फळबागांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांनी मोसंबी अक्षरशः रस्त्यावर फेकावी लागत असून उत्पादनाला बाजारभाव नसल्याने शेतकरी हवालदिल पाहायला मिळत आहे.
अतिवृष्टीमुळे खरीप पिकांसोबतच फळबागांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतकऱ्यांनी तातडीने आणि वाढीव नुकसानभरपाईची मागणी केली आहे. सरकारकडून मदतीची अपेक्षा ठेवून शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, खरीप पिकांसाठी हेक्टरी 50 हजार रुपये, तर फळबागांसाठी एक लाख रुपये अनुदान मिळावे. यासोबतच कर्जमाफी व पिक विमा देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.