Ganesh Visarjan : अनंत चतुर्दशीसाठी मुंबई पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Ganesh Visarjan : अनंत चतुर्दशीसाठी मुंबई पोलिसांचा तगडा बंदोबस्त

आज 28 सप्टेंबर अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आज 28 सप्टेंबर अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबईतील गिरगांव, दादर, जुहू, अक्सा या प्रमुख विसर्जन स्थळांसह 73 नैसर्गिक ठिकाणांव्यतिरिक्त 160 हून अधिक कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

दहशतवादी विरोधी पथकाची एक टीमदेखील तैनात असणार आहे. संशयास्पद वस्तू आढळल्यास त्याच्या तपासणीसाठी 3 बॉम्बनाशक पथकेदेखील तैनात करण्यात येणार आहे.

यासोबतच मुंबई पोलीस दलाकडून 8 अप्पर पोलीस आयुक्त, 25 पोलीस उपायुक्त, 45 सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह पोलीस अंमलदार बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहेत. पोलिसांच्या वैद्यकीय रजा वगळता इतर सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्यात असून अनंत चतुर्दशीसाठी मुंबई पोलिसांकडून चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com