Srinagar Snowfall : श्रीनगर आणि काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी; विमानसेवा आणि रस्ते वाहतूक बाधित, मोठ्या संख्येनं पर्यटकही अडकले
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Srinagar Snowfall) श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत असून विमानसेवा काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. सर्व विमानसेवा ठप्प झाली असून संपूर्ण श्रीनगर शहर बर्फाच्या पांढऱ्या चादरीखाली झाकून गेल्याचे पाहायला मिळत आहे.
या बर्फवृष्टीमुळे धीम्या गतीने वाहतूक सुरू आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून पर्यटकांची गैरसोय झाली आहे. पर्यटकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आणि हवाई सेवा विस्कळीत झाली आहे.
यातच आज आणि उद्या येथील बहुतेक ठिकाणी हिमवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रस्त्यावरील बर्फ हटवण्याचं काम सुरू असून विमानसेवा, रस्ता वाहतूक, रेल्वे सेवा बंद असल्यामुळे हजारो पर्यटक काश्मीरमध्ये अडकले आहेत.
Summary
श्रीनगरमध्ये रात्रीपासून जोरदार बर्फवृष्टी सुरू
जनजीवन विस्कळीत, पर्यटकांची गैरसोय
हजारो पर्यटक काश्मीरमध्ये अडकले
