हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर; शरद पवार यांची प्रतिक्रिया म्हणाले...

हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर; शरद पवार यांची प्रतिक्रिया म्हणाले...

हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. झारखंड उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. जमीन घोटाळ्या प्रकरणात हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले की, झारखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री @HemantSorenJMM यांना राजकीयदृष्ट्या प्रेरित खटल्यात तुरुंगवास भोगावा लागला. १४९ दिवसांच्या लढ्याला आज न्यायाचा मार्ग मिळाला.

यासोबतच ते म्हणाले की, सोरेन यांना न्यायालयाने दिलेल्या जामीनामुळे सत्याचा विजय हा जास्त दूर नाही अशी भावना दृढ झाली आहे. एनडीए सरकारकडे आमची मागणी राहील, की सूड भावनेने कोणतीही कारवाई न होता संविधानानुसार लोकशाहीची भरभराट होईल अशी कामगिरी करावी. सत्यमेव जयते! असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com