Hemant Soren CM Of Jharkhand: झारखंडचे 14वे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच, घेतला "हा" पहिला निर्णय
झारखंडमधील नेते हेमंत सोरेन यांनी गुरुवारी रांची येथे झारखंडचे १४वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. झारखंडच्या मंत्रिमंडळाची संख्या 12 इतकी आहे. हेमंत सोरेन हे झारखंडचे 14 वे मुख्यमंत्री असले तरी ते आता चौथ्यांदा मुख्यमंत्रिपद भुषवत आहेत. यावेळी इंडिया आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित होते. झारखंडच्या मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांचा शपथविधी सोहळा न होता केवळ हेमंत सोरेन यांचा शपथविधी पार पडला. तर झामुमोच्या नेतृत्वात इंडिया आघाडीने विधानसभा निवडणुकीत ८१पैकी ५६ जागांवर प्रभुत्तव मिळवलं तर हेमंत सोरेन यांनी त्यांच्या बारहैत मतदारसंघातून 40 हजार मतांनी विजयी मिळवला.
हेमंत सोरेन यांनी घेतलेला निर्णय
शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर हेमंत सोरेन यांनी एक निर्णय घेतला आणि त्यामध्ये मैय्या सन्मान योजनेतील एक हजार रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला असून महिलांना आता दरमहा 2500 रुपये मिळणार आहेत, असं त्यांनी सांगितलं. तर याची सुरुवात डिसेंबर महिन्यापासून होणार आहे. केंद्र सरकारकडून 1.36 लाख कोटी रुपये मिळवण्यासाठी कायदेशीर पर्यायांचा वापर करणार असल्याचे संकेत देखील हेमंत सोरेन यांनी दिले. महसूल विभागातर्फे खाणींवरील कर वाढवण्याचा निर्णय देखील घेतला गेला आहे.