Maharashtra Cricket Association :  महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या बेकायदेशीर सभासद नोंदणीवर उच्च न्यायालयाचा आक्षेप

Maharashtra Cricket Association : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या बेकायदेशीर सभासद नोंदणीवर उच्च न्यायालयाचा आक्षेप

श्री. केदार जाधव व लातूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. कमलेश ठक्कर यांनी भाजपा आमदार Adv. राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाने व पाठिंब्यामुळे माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या.
Published by :
Team Lokshahi
Published on

श्री. केदार जाधव व लातूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. कमलेश ठक्कर यांनी भाजपा आमदार Adv. राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाने व पाठिंब्यामुळे माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विरुद्ध याचिका दाखल करून बेकायदेशीरपणे 400 पेक्षा अधिक सभासद घेण्यात आले होते.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मूळ १५४ सभासद होते, असोसिएशनच्या अपेक्स कौन्सिलने कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबवता बेकायदेशीरपणे 400 सभासद करून घेतले तसेच वरील सभासद यांना सदस्य पद देताना विदयमान अध्यक्ष आमदार रोहित पवार यांची पत्नी, सासरे, मेव्हणा व इतर नातेवाईक असे एकूण 18 कुटुंबातील सदस्य, व्यवसायाशी निगडित 31 सदस्य व मित्रपरिवारातील इतर 15 सदस्य असे एकूण 64 सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 37 नेते यांना सदस्य म्हणून घेण्यात आले.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मूळ सदस्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस व सूचना न देता तसेच कोणत्याही प्रकारचा असोसिएशनचा ठराव पारित न करता व माननीय सर्वोच्च न्यायालय यांची पूर्वपरवानगी न घेता वरील 400 सदस्य दाखल करून घेण्यात आले आहे. सदरची बाब बेकायदेशीर असल्याची नोंद घेत माननीय उच्च न्यायालयाने निवडणूक अधिकारी यास निवडणुकीची पुढील कारवाई थांबविण्याचे आदेश पारित केलेले आहेत. श्री केदार जाधव व लातूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने Adv. संदीप साळुंखे यांनी बाजू मांडली

थोडक्यात

• श्री. केदार जाधव व लातूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. कमलेश ठक्कर यांची महत्त्वाची भूमिका
• भाजपा आमदार Adv. राहुल कुल यांच्या मार्गदर्शन व पाठिंब्याने पुढाकार
• माननीय उच्च न्यायालय, मुंबई येथे याचिका दाखल
• याचिका महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) विरोधात
• बेकायदेशीरपणे 400 पेक्षा अधिक सभासद घेतल्याचा आरोप
• सभासद नोंदणी प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा दावा
• प्रकरणामुळे क्रिकेट प्रशासनात खळबळ

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com