Vijay Mallya : फरार उद्योगपती विजय मल्ल्याला उच्च न्यायालयाचा दणका; पुढील सुनावणी 18 फेब्रुवारीला
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Vijay Mallya) 'देशात परत या, नाहीतर सुनावणी घेणार नाही' असे न्यायालयाने विजय मुल्ल्याला बजावले आहे. फरार उद्योगपती विजय मल्ल्याला उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांनी आदेश दिला आहे.
मल्ल्याने उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या आहेत. मल्ला परत येऊ शकत नसेल, तर ही याचिका ऐकू शकत नाही, असे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. भारतात परतणार की नाही या संदर्भात स्पष्ट भूमिका सांगावी असे आदेश मल्ल्याला देण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 फेब्रुवारीला होणार असून या सुनावणीत काय होते हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summary
देशात परत या नाहीतर सुनावणी घेणार नाही
फरार उद्योगपती विजय मल्ल्याला उच्च न्यायालयाचा दणका
पुढील सुनावणी 18 फेब्रुवारी रोजी
