मुंबईच्या समुद्रात हायटाईड; उंच लाटा उसळणार

मुंबईच्या समुद्रात हायटाईड; उंच लाटा उसळणार

आज सकाळपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आज सकाळपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक सकल भागात पाणी तुंबल्याचे चित्रही दिसत आहे मुंबईतील अंधरी सबवे देखील पुन्हा पाण्याने तुंबला आहे. मुंबई शहर व उपनगरात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्‍याची शक्‍यता आहे. अधूनमधून ४५ ते ५५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. उंच लाटा उचलण्यास सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने मुंबईला ऑरेंज अर्लट दिला आहे. 45 ते 55 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. येत्या काही वेळात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

भरती -

दुपारी - ०२:२७ वाजता - ४.२१ मीटर

ओहोटी -

सायंकाळी - ०७:२५ वाजता - ०१.६१ मीटर

भरती -

(उद्या - २२.०७.२०२३) मध्यरात्री - ०२:१४ वाजता - ३.६७ मीटर

ओहोटी -

(उद्या - २२.०७.२०२३) पहाटे - ०७:४५ वाजता - ०१.२३ मीटर

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com