Shivneri Fort: शिवरायांच्या जन्मोत्सवानिमित्त शिवनेरी किल्ल्यावर हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे आयोजन

शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे आयोजन होणार.
Published by :
Prachi Nate

शिवनेरी किल्ल्यावर हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन हे आयोजन करण्यात आले आहे. शिवनेरी किल्ल्यावर १९ ते २१ फेब्रुवारी दरम्यान महोत्सवाचे आयोजन होणार आहे. महोत्सवासाठी ४.९१ कोटी रुपयांच्या निधीसाठी मान्यता देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची ओळख करुन देणे, तसेच राज्यातील गडकिल्ल्यांविषयी आकर्षण निर्माण करुन देश-विदेशातील पर्यटकांना राज्यात आकर्षित करण्यासाठी महोत्सवाचे आयोजन करण्याचे उद्देश आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com