सर्वोच्च न्यायालयाचा अदाणींना धक्का; माध्यमांना निर्देश देण्यास नकार

सर्वोच्च न्यायालयाचा अदाणींना धक्का; माध्यमांना निर्देश देण्यास नकार

अदाणींना सर्वोच्च न्यायालयाने झटका दिला आहे. त्यांना धक्क्यांवर धक्के बसत आहेत.

गौतम अदाणींना सर्वोच्च न्यायालयाने झटका दिला आहे. त्यांना धक्क्यांवर धक्के बसत आहेत. हिंडेनबर्ग अहवाल आणि अदाणी समूह यासंदर्भात माध्यमांमध्ये होणाऱ्या वार्तांकनावर मर्यादा घालण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती.

यासंदर्भात होणारं कोणतंही वार्तांकन सेबीकडून मंजुरी मिळाल्यानंतरच केलं जावं, अशीही मागणी करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सांगितले की, “आम्ही यासंदर्भात कधीही अशा प्रकारचे निर्देश माध्यमांना देणार नाही. आम्ही लवकरच या प्रकरणाचा निकाल जाहीर करू”असे त्यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी हिंडेनबर्ग रिसर्चनं अदाणी उद्योग समूहाबाबत प्रकाशित केलेल्या एका अहवालामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी खळबळ उडाली. अदाणी उद्योग समूहाने शेअर बाजारात गैरव्यवहार केल्याचा दावा या अहवालात करण्यात आला. यानंतर अदाणी उद्योग समूहाला आत्तापर्यंत १०० बिलियन डॉलर्सहून अधिक फटका बसला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com