हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्स जळीतकांड प्रकरण; "चालकाचा पगार थकवला नाही"; व्युमा ग्राफिक्सच्या मालकाचे स्पष्टीकरण

हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्स जळीतकांड प्रकरण; "चालकाचा पगार थकवला नाही"; व्युमा ग्राफिक्सच्या मालकाचे स्पष्टीकरण

पुण्यातील हिंजवडी परिसरामध्ये टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग लागल्याची घटना घडली होती.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पुण्यातील हिंजवडी परिसरामध्ये टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेमध्ये चौघांचा होरपळून मृत्यू झाला. आता या घटनेनं नवीन वळण घेतल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये आता नवीन माहिती समोर येत आहे ती म्हणजे या टेम्पो ट्रॅव्हल्सला आग लागली नाही तर चालकाने ती गाडी पेटवल्याची माहिती समोर येत आहे.

या पार्श्वभूमीवर आता चौघांचा जीव घेतल्याप्रकरणी आणि चार जणांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडीतील व्युमा ग्राफिक्स कंपनीने पगार थकवला, म्हणून टेम्पो ट्रॅव्हल पेटवली अशी कबुली चालक जनार्दन हंबर्डीकरने दिली होती मात्र आता व्युमा ग्राफिक्सच्या मालकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

व्युमा ग्राफिक्सच्या मालकांनी सांगितले की, "आम्ही त्याचा एक रुपयांचा ही पगार थकवला नाही. वेळेच्यावेळी त्याला पगार दिला आहे. पोलीस तपास करतायेत, आम्ही त्यांना सहकार्य करतोय." असे त्यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com