ताज्या बातम्या
Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऐतिहासिक निर्णय! वाड्या, रस्त्यांची जातीवाचक नावं बदलणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 192 वस्त्यांची आणि 25 रस्त्यांची जातीवाचक असलेली जुनी नावे बदलून महापुरुषांची आणि लोकशाही मूल्यांची निगडित असलेली नावे देण्याचा निर्णय घेतला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 192 वस्त्यांची आणि 25 रस्त्यांची जातीवाचक असलेली जुनी नावे बदलून महापुरुषांची आणि लोकशाही मूल्यांची निगडित असलेली नावे देऊन, महत्त्वपूर्ण निर्णय सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला आहे.
या निर्णयामुळे शहरी आणि ग्रामीण भागात हरिजनवाडी, जाधववाडी, चर्मकारवाडी, बौद्धवाडी अशा जातिवाचक नावांनी कोणतेच रस्ते आणि वाड्यांचा उल्लेख होणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हा फार मोठा निर्णय असून पालकमंत्री नितेश राणे यांनी जनता दरबारमध्ये अनुसूचित जातीच्या शिष्टमंडळाला दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. हा निर्णय जिल्ह्याच्या सामाजिक ऐक्याला बळकटी देणारा ठरणार आहे.