HMPVच्या पार्श्वभूमीवर राज्यात 3 विषाणू संशोधन निदान प्रयोगशाळा; आरोग्य विभागाचा निर्णय

HMPVच्या पार्श्वभूमीवर राज्यात 3 विषाणू संशोधन निदान प्रयोगशाळा; आरोग्य विभागाचा निर्णय

पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचा समावेश
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • राज्यात 3 विषाणू संशोधन निदान प्रयोगशाळा निश्चित

  • HMPVच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचा निर्णय

  • पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचा समावेश

अमोल धर्माधिकारी, पुणे

कोरोनानंतर आता पुन्हा एकदा एचएमपीव्ही व्हायरसची दहशत निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. देशात एचएमपीव्ही रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर एचएमपीव्हीची चाचणी करण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील तीन विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळा निश्चित केल्या असून यामध्ये पुण्यातील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेचा समावेश आहे.

रुग्णांचे नमुने चाचणीसाठी पुण्यातील एनआयव्हीसह नागपूरमधील एम्स रुग्णालय आणि मुंबईतील कस्तुरबा संसर्गजन्य रोग रुग्णालय या तीन विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळा निश्चित केल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com