Horrific explosion of hydrogen gas balloons in the lift of a Goregaon building
Horrific explosion of hydrogen gas balloons in the lift of a Goregaon building

Goregaon Fire : इमारतीच्या लिफ्टमध्ये हायड्रोजन गॅस फुग्यांचा भीषण स्फोट

मुंबईतील गोरेगाव पश्चिम भागात धक्कादायक घटना घडली आहे. अनमोल टॉवर या इमारतीच्या लिफ्टमध्ये अचानक जोरदार स्फोट झाला.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Goregaon Fire : मुंबईतील गोरेगाव पश्चिम भागात धक्कादायक घटना घडली आहे. अनमोल टॉवर या इमारतीच्या लिफ्टमध्ये अचानक जोरदार स्फोट झाला. वाढदिवसाच्या सजावटीसाठी नेण्यात येत असलेले गॅस भरलेले फुगे याचा कारणीभूत ठरले. या दुर्घटनेत दोन तरुण आणि एका तरुणीला भाजल्याच्या जखमा झाल्या आहेत.

घटना घडताच काही क्षणांत लिफ्ट आगीच्या ज्वाळांनी भरली. सुदैवाने दरवाजा उघडाच असल्याने तिघांनी तात्काळ बाहेर धाव घेतली आणि मोठा अनर्थ टळला. हा थरारक प्रसंग लिफ्टमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे.

तज्ज्ञांच्या मते, हायड्रोजनसारखा वायू अतिशय पटकन पेट घेणारा असतो. अगदी छोट्या ठिणगीमुळेही तो भडकू शकतो. त्यामुळे अशा फुग्यांचा वापर करताना विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

थोडक्यात

  • मुंबईतील गोरेगाव पश्चिम भागात धक्कादायक घटना घडली आहे.

  • अनमोल टॉवर या इमारतीच्या लिफ्टमध्ये अचानक जोरदार स्फोट झाला.

  • वाढदिवसाच्या सजावटीसाठी नेण्यात येत असलेले गॅस भरलेले फुगे याचा कारणीभूत ठरले.

  • या दुर्घटनेत दोन तरुण आणि एका तरुणीला भाजल्याच्या जखमा झाल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com