Nashik Lottery 2025 : नाशिकरांसाठी खुशखबर! Mhada च्या 'इतक्या' घरांची लॉटरी; ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू
नाशिक शहरातील नागरिकांसाठी परवडणाऱ्या घरांचे स्वप्न साकार करण्याची संधी म्हाडाने उपलब्ध करून दिली आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या फ्लॅट्ससाठी म्हाडा लॉटरी जाहीर करण्यात आली असून घरांच्या किंमती सुमारे १४ लाख रुपयांपासून सुरू होत आहेत. अनेक वर्षे स्वतःचे घर घेण्याची इच्छा बाळगणाऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरली आहे. या योजनेअंतर्गत नाशिक मंडळाने ४०२ निवासी घरे उपलब्ध करून दिली आहेत. अॅडव्हान्स कंट्रीब्युशन (आगाऊ भरणा) पद्धतीवर आधारित या लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि स्वीकार प्रक्रिया सोमवारी पासून सुरू झाली.
म्हाडा लॉटरीचे अधिकृत उद्घाटन
‘गो लाईव्ह’ कार्यक्रमात म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (IAS) यांनी नाशिक लॉटरीचे उद्घाटन केले. ज्या ठिकाणी घरे उपलब्ध आहेत त्या प्राधान्य स्थळांमध्ये चुंचाळे, पाथर्डी, मखमलाबाद, आडगाव आणि सातपूर या भागांचा समावेश आहे. इच्छुक नागरिकांनी [https://housing.mhada.gov.in] (https://housing.mhada.gov.in) किंवा [https://mhada.gov.in](https://mhada.gov.in) या संकेतस्थळांवर जाऊन ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.
विविध गटांसाठी उपलब्ध घरे
अल्प उत्पन्न गट (LIG)
चुंचाळे : १३८
पाथर्डी : ३०
मखमलाबाद : ४८
आडगाव : ३३
एकूण : २९३ घरे
मध्यम उत्पन्न गट (MIG)
सातपूर : ४०
पाथर्डी : ३५
आडगाव : ३४
एकूण : १०९ घरे
घरांच्या किंमती ₹14,94,000 ते ₹36,75,000 पर्यंत आहेत. अर्ज करताना उत्पन्नाचा पुरावा आवश्यक असून, आयकर विवरणपत्र किंवा तहसील कार्यालयाचे उत्पन्न प्रमाणपत्र यातील कोणतेही एक प्रमाणपत्र मान्य केले जाईल.
अर्जाची महत्त्वपूर्ण तारखा
अर्ज सुरू : १ डिसेंबर २०२५
अंतिम मुदत : २३ डिसेंबर २०२५, रात्री ११.५९
अनामत रक्कम जमा : २४ डिसेंबर २०२५ पर्यंत (RTGS/NEFT
दावे–हरकती : ३० डिसेंबर २०२५ ते २ जानेवारी २०२६
अंतिम यादी : ६ जानेवारी २०२६
सोडत तारीख : लवकरच ऑनलाइन प्रसिद्ध

