Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांचं अमित ठाकरे यांच्यासोबत बॉन्डिंग कसं?
मुंबईसह राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून विशेषतः मुंबई महापालिकेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. याच पार्श्वभूमीवर ‘लोकशाही मराठी’च्या क्रॉस फायर कार्यक्रमात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी ठाकरेबंधूच्या युतीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
यावेळी ते म्हणाले की, "महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्र आल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोघेही प्रचारात सक्रिय असून, त्यांच्या वाढत्या बॉन्डिंगमुळे मराठी राजकारणात सकारात्मक चर्चा सुरू आहे. अनेक वर्षांनंतर दोन भाऊ एकाच दिशेने काम करत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे." “२० वर्षांपूर्वी उद्धव साहेब आणि राजसाहेबांनी वेगवेगळ्या पक्षांमधून काम करण्याचा निर्णय घेतला. विचारधारा जवळपास सारखी आहे, काही पद्धती वेगळ्या असू शकतात. पण कुटुंब म्हणून जो दुरावा होता, तो आता पूर्णपणे भरून निघालाय, मी आणि अमित शाळेत एकत्र होतो, खेळायचो, मस्ती करायचो. जे काही त्या काळात तुटलं होतं, ते आता राहिलेलं नाही. सगळं स्पष्ट आणि व्यवस्थित आहे,” अअसं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
थोडक्यात
• मुंबईसह राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे.
• १६ जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
• या निवडणुकांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
• विशेषतः मुंबई महापालिकेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
• याच पार्श्वभूमीवर ‘लोकशाही मराठी’च्या क्रॉस फायर कार्यक्रमात आमदार आदित्य ठाकरे सहभागी झाले.
• शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते म्हणून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
• यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
