बोर्डाचा गजब कारभार; बारावीच्या पहिल्याच पेपरमध्ये प्रश्नासोबत दिले थेट उत्तर

बोर्डाचा गजब कारभार; बारावीच्या पहिल्याच पेपरमध्ये प्रश्नासोबत दिले थेट उत्तर

आज बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पहिला इंग्रजी विषयाचा पेपर होता. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी बोर्डाचा भोंगळ कारभार समोर आला.
Published by :
Sagar Pradhan

आजपासून राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी बारावी बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली आहे. संपूर्ण राज्यातून बारावीच्या परीक्षेला 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी बसले आहेत. परंतु, लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरणाऱ्या या परीक्षबाबत आज एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आज बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पहिला इंग्रजी विषयाचा पेपर होता. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी बोर्डाचा भोंगळ कारभार समोर आला. प्रश्नपत्रिकेत प्रश्नच छापून आला नाही. मात्र, त्याऐवजी थेट उत्तर छापण्यात आले आहे. त्यामुळे ऐनवेळी विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

या गोंधळाबाबत बोर्डाने स्पष्टीकरण देखील दिले आहे. बोर्डाने या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे म्हटले आहे. परंतु, यामुळे विद्यार्थ्यांना त्या प्रश्नांचे गुण मिळतील का? या बाबत प्रश्न निर्माण झाला आहे. किंवा या घोळामुळे विद्यार्थ्यांना सहा गुणांची लॉटरी लागणार अशी देखील शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

नेमकं काय झाला घोळ?

इंग्रजी पेपर मधील प्रश्न क्रमांक 3 इंग्रजी कवितेववर आधारित होता. प्रश्न क्रमांक 3 मधील उप प्रश्नात घोळ झाला असल्याचे समोर आले आहे. पान नंबर १० वर प्रश्न क्र. ३ वर आणि त्यातील उपप्रश्न A3, A4 आणि A5 मध्ये प्रश्नच दिलेला नाही यात A5 आणि A5 मध्ये प्रश्नच दिलेला नाही, तर A4 मध्ये थेट उत्तरच दिलेले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com