जळगाव मध्ये BRSचा राष्ट्रवादी व शिंदे गटाला मोठा धक्का

जळगाव मध्ये BRSचा राष्ट्रवादी व शिंदे गटाला मोठा धक्का

राष्ट्रवादी व शिंदे गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी केला बी आर एस पक्षात प्रवेश
Published by  :
shweta walge

जळगावात बी आर एसचा राष्ट्रवादी व शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी व शिंदे गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी बी आर एस पक्षात प्रवेश केला आहे.

जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी व शिंदे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी बी आर एस पक्षात प्रवेश केला असून बीआरएसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश करण्यात आला आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार हे जळगाव जिल्ह्यात असताना राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांनी बी आर एस पक्षात प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे. शिंदे गटाच्या ही कार्यकर्त्यांनी बी आर एस पक्षात प्रवेश केल्याने शिंदे गटालाही हा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, आज बीडमध्ये भाजपचे माजी सरपंच आणि चार विद्यमान सदस्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. याने भाजपला चांगलाच धक्का लागला आहे.

जळगाव मध्ये BRSचा राष्ट्रवादी व शिंदे गटाला मोठा धक्का
अजित पवार गटाचा भाजपला धक्का

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com