Flipkart Big Billion Sale : फ्लिपकार्टच्या सेलमध्ये मोठा झोल
Flipkart Big Billion Sale : फ्लिपकार्टच्या सेलमध्ये मोठा झोल, Iphone ची ऑर्डर आपोआप रद्द? Flipkart Big Billion Sale : फ्लिपकार्टच्या सेलमध्ये मोठा झोल, Iphone ची ऑर्डर आपोआप रद्द?

Flipkart Big Billion Sale : फ्लिपकार्टच्या सेलमध्ये मोठा झोल, Iphone ची ऑर्डर आपोआप रद्द?

फ्लिपकार्ट सेल गोंधळ: आयफोन ऑर्डर रद्द, ग्राहक संतप्त!
Published by :
Riddhi Vanne
Published on

Flipkart Big Billion Sale I phone Order Scam : सध्या अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टचा सेल सध्या सुरु आहे. या सेलमध्ये अनेकजण खरेदी करतात. नुकतेच आयफोनने 17 प्रो लॉच केला आहे. त्यानंतर हा सेल सुरु झाला. आता या सेलमधला एक मोठा गोंधळ समोर आला आहे. अत्यंत कमी दरात अ‍ॅपल आयफोनसारखे महागडे स्मार्टफोन विकले जात असल्याचं दाखवून ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर ऑर्डर घेतल्या गेल्या. मात्र, नंतर त्या ऑर्डर्स अचानक रद्द करण्यात आल्याने ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

या सेल दरम्यान आयफोन 16 व आयफोन 16 प्रो हे हँडसेट अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध असल्याचे जाहिर केले गेले होते. विक्री वाढवण्यासाठी आणि काही जुन्या मालाचा साठा संपवण्यासाठी हे धोरण आखल्याचे बोललं जात आहे. अनेकांनी भराभर ऑर्डर केल्या आणि पेमेंटही यशस्वीरित्या पार पडलं. मात्र काही वेळातच फ्लिपकार्टकडून संदेश आला की, ऑर्डर रद्द करण्यात आली आहे. त्यात हेही नमूद केलं गेलं की, पेमेंट अयशस्वी ठरल्यामुळे ऑर्डर पूर्ण करता आलेली नाही. जरी व्यवहार आधी यशस्वी झालेला असला तरी.

या प्रकारामुळे हजारो ग्राहकांमध्ये भ्रम निर्माण झाला असून, त्यांनी सोशल मीडियावर फ्लिपकार्टला प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. अनेकांनी ही केवळ जाहिरातबाजी असून ग्राहकांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com