'मला इम्रान खान यांना मारायचं होतं' हल्लेखोराने केला खुलासा

'मला इम्रान खान यांना मारायचं होतं' हल्लेखोराने केला खुलासा

इम्रान खान यांच्या ताफ्यावर गोळीबार झाला. या गोळीबारातून इम्रान खान जखमी झाले. या घटनेमुळे पाकिस्तानात मोठी खळबळ उडाली आहे.

इम्रान खान यांच्या ताफ्यावर गोळीबार झाला. या गोळीबारातून इम्रान खान जखमी झाले. या घटनेमुळे पाकिस्तानात मोठी खळबळ उडाली आहे. वजीराबाद येथील जफर अली खान चौकाजवळ हा गोळीबार झाल्याची माहिती पाकिस्तानी मीडियाने दिली आहे. इम्रान खान यांच्या पक्षाची रॅली पाकिस्तानच्या गुजराँवाला येथे काढण्यात आली होती.

या रॅलीत इम्रान खान देखील सहभागी झाले होते. या रॅलीत अचानक काही हल्लेखोर घुसले आणि त्यांनी जवळपास सहा ते सात राऊंड फायर केले. या हल्ल्यात पाच जण जखमी झाले. विशेष म्हणजे जखमींमध्ये इम्रान खान देखील असल्याची माहिती मिळत आहेत. इम्रान यांच्या पायाला गोळी लागल्याची माहिती मिळत आहे. त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

याच पार्श्वभूमीवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराने खुलासा करत म्हटलं आहे की, 'मला इम्रान खान यांना मारायचं होतं. मी लाहोर येथून निघालो तेव्हाच मी हे ठरवलं होतं.' तसेच 'इम्रान खान लोकांना भडकवण्याचं काम करत आहेत म्हणून मला फक्त आणि फक्त इम्रान यांना मारायचं होतं. माझ्या मागे इतर कुणाचाही हात नाही. मी एकटा इम्रान यांना मारण्यासाठी आलो होतो.'असे त्याने सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार हल्ल्यानंतर इम्रान खान यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, 'अल्लाहमुळे मी वाचलो, अल्लाहने मला नवीन जीवन दिलं आहे.' असे म्हटले आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com