Metro Accident Compensation Rules 2025 : मेट्रो प्रवाशांसाठी अतिशय दिलासादायक बातमी
Metro Accident Compensation Rules 2025 : मेट्रो प्रवाशांसाठी अतिशय दिलासादायक बातमी; जाणून घ्या किती मिळणार नुकसानभरपाईMetro Accident Compensation Rules 2025 : मेट्रो प्रवाशांसाठी अतिशय दिलासादायक बातमी; जाणून घ्या किती मिळणार नुकसानभरपाई

Metro Accident Compensation Rules 2025 : मेट्रो प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी; अपघात झाल्यावर मिळणार 'एवढी' रक्कम

मेट्रो अपघातात प्रवाशांना मिळणार ८ लाख रुपयांची नुकसानभरपाई
Published by :
Riddhi Vanne
Published on

Metro Accident Compensation Rules 2025 : आजकाल मुंबईसह इतर उपनगरांमध्ये जिथे जिथे मेट्रोची सेवा उपलब्ध आहे. तिथे सर्व प्रवासी मेट्रोसेवेचा जास्तीत जास्त लाभ घेत असतात. या मेट्रोने प्रवास करताना एखाद्याचा अपघात झाला तर त्याला Metro Railways (Procedure of Claims) Rules, 2025 या कायद्यानुसार नुकसानभरपाईची तरतूद सरकारतर्फे करण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी ही अतिशय दिलासादायक बातमी आहे.

मेट्रो रेल्वेचे जाळे भारतातल्या 17 शहरांमध्ये विस्तारलेले आहे. त्यामध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगलुरु, नॉएडा, अहमदाबाद, पुणे, नागपुर, कोच्ची या शहरांचा समावेश असून मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मेट्रोने प्रवास करणाऱ्यांच्या प्रवाशांच्या अपघाताचे ही प्रमाण वाढताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर मेट्रो रेल्वेने प्रवास करताना एखाद्या प्रवाशाचा अपघात झाला किंवा एखादा प्रवासी मृत्युमुखी पडला तर मेट्रो रेल्वेतर्फे त्या प्रवाश्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. हा नियम देशातील सर्व मेट्रो सेवेसाठी लागू केला गेला आहे.

यासाठी खालील नुकसानभरपाईची नियमावली लागू केली गेली आहे.

1) मेट्रो रेल्वे अपघातामध्ये जर एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला ८लाख रुपये नुकसान भरपाई मिळेल 2007 च्या नियमानुसार ही रक्कम ४ लाख रुपये होती

2) मेट्रोच्या अपघातामध्ये एखाद्या व्यक्तीचे दोन्ही हात कापले गेले किंवा एक हात आणि एक पाय कापले गेले तर अशा परिस्थितीमध्ये ८ लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाईल पूर्वी रक्कम ४ लाख रुपये इतकी होती

3) हिप जॉईनला फॅक्चर झाल्यास १.६ लाख रुपये मिळतील

4)दोन पायांच्या हाडांचे फ्रॅक्चर झाल्यास १.६लाख रुपये मिळतील

5) पाठीच्या कणा फ्रॅक्चर झाल्यास २. ४ लाख रुपये मिळतील

6)अर्धांग वायू झाल्यास ४लाख रुपये मिळतील

7) एखाद्या व्यक्ती वरीलपैकी कोणत्याही नियमात बसत नसेल मात्र ती व्यक्ती मेट्रो अपघतात जखमी झाल्यानंतर जर कोणतेही काम करण्यास सक्षम नसेल तर त्या व्यक्तीला ४ लाख रुपयेनुकसान भरपाई देण्यात येईल.

हेही वाचा..

Metro Accident Compensation Rules 2025 : मेट्रो प्रवाशांसाठी अतिशय दिलासादायक बातमी
Vakola Bridge : मुंबईतील वाहतूक कोंडीतून सुटका; वाकोला पूल नागरिकांसाठी लवकरच खुला
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com