Supriya Sule : धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेतलं तर...; सुप्रिया सुळेंचा इशारा, OBC आक्रमक
माणिकराव कोकाटे यांना सदनिका वाटपातील गैरव्यवहार प्रकरणी अटक होण्याची शक्यता असतानाच, दुसरीकडे त्यांची खाती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढून घेतली आहे. यामुळे माणिकराव कोकाटे सध्या बिनखात्याचे मंत्री झाले आहेत. सध्या माणिकराव कोकाटेंकडून तिन्ही खाती उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सोपवण्यात आली आहे. पण वाल्किम कराडमुळे हे खातं राजीनामा द्यावा लागलेले धनंजय मुंडे यांच्याकडे दिलं जाण्याची शक्यता आहे. यासाठीच त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. मात्र जर धनंजय मुंडे यांना मंत्रीमंडळात घेतलं तर बीडमध्ये जाऊन उपोषणाला बसणार असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.
बीडमध्ये जाऊन धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करुन घेतल्यास उपोषणाला बसणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा निर्धार व्यक्त केला. धनंजय मुंडे यांना मंत्री मंडळात घेणार असल्याच्या चर्चेनंतर सुप्रिया सुळे यांनी महायुतीच्या नेत्यांना मेसेज केले आहेत. सुप्रिया सुळे यांनी तरीही मंत्रीमंडळात घेतले तर बीडमध्ये जाऊन उपोषणाला बसणार असल्याचं सांगितलं आहे. यानंतर ओबीसी नेत्यांनी सुप्रिया सुळेंना इशारा दिला आहे.
सुप्रियाताई माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मागा, पार्थ पवार प्रकरणात लाडक्या दादांचा राजीनामा मागा ना.. त्यासाठी उपोषण करा ना अशी मागणी ओबीसी नेत्यांनी केली आहे. मुंडे कुटुंबच्या मागे बीडमधील प्रस्थापित लागले आहेत, याचं नेतृत्व पवार करतात. धनंजय मुंडे यांची मीडिया ट्रायल करून राजीनामा घेतल. तुम्ही बीडमध्ये उपोषण केलात तर आम्ही बारामतीमध्ये करू असा इशारा त्यांनी दिला आहे. महाराष्ट्रामधील तमाम ओबीसी समाज धनंजय मुंडेंच्या मागे लागला आहे. त्याना मंत्रिपद मिळालंच पाहिजे असंही ते म्हणाले आहेत.
अमित शाह यांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे यांचं ट्विट
"आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री आदरणीय श्री. अमित भाई शहा यांची भेट घेऊन परळी वैद्यनाथ स्थित प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थ स्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश करण्याबाबत विनंती केली. या योजनेच्या माध्यमातून ज्योतिर्लिंग स्थळाचा विकास व कायाकल्प झाल्यास परळी शहरासह संपूर्ण बीड जिल्ह्याच्या विकासात एक मोठा व सकारात्मक बदल घडणार आहे; त्याचबरोबर मतदारसंघातील एका कारखान्यासंदर्भात चर्चा केली. वेळ घेतल्याप्रमाणे पूर्वनियोजित आजची ही भेट होती," असं एक्सवरुन पोस्ट धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे.
