"छत्रपतींचा अपमान केल्यास गाठ माझ्याशी" अभिजित बिचुकले

"छत्रपतींचा अपमान केल्यास गाठ माझ्याशी" अभिजित बिचुकले

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे पद मोठं आहे. अलीकडच्या काळात छत्रपतींबद्दल जाणीवपूर्वक अपशब्द बोलण्याचा ट्रेंड आणला गेला आहे.

प्रशांत जगताप | सातारा : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे पद मोठं आहे. अलीकडच्या काळात छत्रपतींबद्दल जाणीवपूर्वक अपशब्द बोलण्याचा ट्रेंड आणला गेला आहे. तसेच सोमवारी सातारा बंद ठेवण्याचे बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेंचे सातारकरांना आवाहन केलं आहे.

महाराजांच्या चप्पलजवळ उभे राहण्याची लायकी नसलेल्यांची तुलना करणे म्हणजे महाराजांचा घोर अपमान आहे. अनेक पक्षांनी महाराजांच्या नावाचा वापर केला आहे. बेताल विधान केल्याबद्दल कोश्यारींना लाज वाटली पाहिजे. जर कोणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला तर गाठ माझ्याशी आहे असे सांगत अभिजित बिचुकलेंनी राज्यपालांचा निषेध शिवप्रेमी म्हणून करत असल्याचे सांगत सोमवारी सातारा बंद ठेऊन या दोघांचा निषेध केला पाहिजे असे आवाहन सातारकरांना केलं आहे.

काय म्हणाले होते राज्यपाल?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी बोलत होते. यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी डीलिट पदवी देऊन गौरवण्यात आलं. यावेळी भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली.

आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असे विधान राज्यपालांनी केले आहे.

"छत्रपतींचा अपमान केल्यास गाठ माझ्याशी" अभिजित बिचुकले
मी राज्यपालांना जवळून ओळखते, त्यांच्या विधानाचा...; अमृता फडणवीसांकडून पाठराखण
Lokshahi Marathi
www.lokshahi.com