CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणेश विसर्जन; 'वर्षा'वर भक्तिमय वातावरण
CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणेश विसर्जन; 'वर्षा'वर भक्तिमय वातावरणCM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणेश विसर्जन; 'वर्षा'वर भक्तिमय वातावरण

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणेश विसर्जन; 'वर्षा'वर भक्तिमय वातावरण

मुख्यमंत्री निवासस्थानी गणेश विसर्जन: 'वर्षा'वर भक्तिमय वातावरण, फडणवीस कुटुंबाचा भावपूर्ण निरोप
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

राज्यात गणपती बाप्पाला भावनिक निरोप

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी बाप्पाचे विर्सजन

'वर्षा'वर भक्तिमय वातावरण

Immersion of Lord Ganesha at Chief Minister Fadnavis's Varsha Bungalow : अनंत चतुर्थीच्या दिवशी शनिवारी संपूर्ण महाराष्ट्रभरात गणेश विसर्जनाचा जल्लोष सुरू झाला आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात ढोल-ताशांच्या नादाने आणि भक्तिभावाच्या वातावरणात गणेशमूर्तींचं विसर्जन होत आहे. राज्यातील सर्व गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीसाठी जय्यत तयारी केली असून, मुंबईसह इतर प्रमुख शहरांत भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. पोलिस आणि महापालिका प्रशासनाने विसर्जनासाठी कडक सुरक्षा व्यवस्था आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबासह त्यांच्या अधिकृत निवासस्थान ‘वर्षा’ येथे गणेश विसर्जन केले. त्यांनी पत्नी अमृता फडणवीस आणि परिवारासह पारंपरिक विधी करून कृत्रिम तलावात बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. वर्षावर या वेळी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.

विसर्जनानंतर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “आज आपण ‘वर्षा’ येथे कृत्रिम तलावात गणपतीचे विसर्जन केले. बाप्पांनी गेल्या दहा दिवसांत आपल्याला आणि संपूर्ण महाराष्ट्राला आशीर्वाद दिला. राज्यभर विसर्जन मिरवणुका उत्साहात सुरू आहेत. मला आशा आहे की सर्व काही शांततेत पार पडेल आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहील.”

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणेश विसर्जन; 'वर्षा'वर भक्तिमय वातावरण
Nashik Ganesh Visarjan : राज्यात गणेश विसर्जनाचा उत्साह; गिरीश महाजानांनी ढोल वाजवत लुटला आनंद
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com