ताज्या बातम्या
Congress : 'या' दिवशी काँग्रेसची पुण्यात महत्वाची बैठक
विधानसभेच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
विधानसभेच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यात काँग्रेसच्या महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर 30 सप्टेंबरला पुण्यात काँग्रेसची महत्वाची बैठक पार पडणार आहे. यानिमित्त काँग्रेस भवन येथे काल बैठक आयोजित करण्यात आली होती.
पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील यांच्या उपस्थित आढावा बैठक होणार असून काल आयोजित करण्यात आलेल्या बैठकीसाठी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार रवींद्र धंगेकर उपस्थित होते.