ओमेगा 3 हे आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेल्या घटकांपैकी एक महत्वाचा घटक आहे. ओमेगा 3 फॅटी ऍसिड एक प्रकारचे पॉलीअनसॅचुरेटेड फॅट आहे, जे आपल्या शरीराच्या सर्वांगीण वाढीसाठी महत्वाची भूमिका बजावते. हृदयाचे आरोग्य आणि मेंदूची कार्यक्षमता सुधारण्यासाठी हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. ओमेगा 3 फॅटी ऍसिड हृदयविकारांचा धोका कमी करून ते ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी करतात. त्यामुळे आपला मेंदूही कार्यक्षम राहतो. ओमेगा 3 फॅटी ऍसिडचे महत्वाचे स्रोत कोणते आणि त्याचा आपल्या शरीराला नेमका कसा फायदा होईल ते जाणून घ्या.
मांसाहारी लोकांसाठी ओमेगा 3 फॅटी ऍसिडचा मुख्य स्रोत मासे हा आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ऍसिड असते. याशिवाय सॅल्मन, मॅकरेल, सार्डिन, ट्राउट आणि हेरिंग यांसारख्या माशांमध्ये हे ऍसिड मोठ्या प्रमाणात आढळते.
शाकाहारी लोकांसाठी अळशी (flax seeds), चिया बियाणे (chia seeds), आणि अक्रोड (walnuts) यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिडचा मोठा साठा असतो. सोयाबीन तेल, रेपसीड तेल, आणि अलसी तेल हे सुद्धा याचे महत्वाचे स्रोत मानले जातात. वनस्पती तेलांमध्येही ओमेगा 3 फॅटी ऍसिड आढळते. काही शैवाल (algae) आणि समुद्री शैवाल (seaweed) हे सुद्धा शाकाहारी लोकांसाठी महत्वाचे स्रोत आहेत.
हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यास मदत करतात.
रक्तातील चरबी कमी करतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवतात.
स्मृती सुधारण्यास, एकाग्रता वाढवण्यास मदत करतात
डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत
निरोगी त्वचा आणि केसांसाठी आवश्यक आहेत.
बाळाच्या योग्य वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक आहेत,
मानसिक विकारांसाठी हे ऍसिड वरदान आहे.
कॅन्सर पेशंटसाठी ओमेगा 3 फॅटी ऍसिड महत्वाचे मानले जाते.
ओमेगा 3 ऍसिडस् आहारातून पुरेसे मिळत नसल्यास, डॉक्टरांच्या सल्ल्याने ओमेगा 3 सप्लिमेंट्स (Fish oil capsules) घेता येतात.