AIMIM leader Imtiaz Jalil
AIMIM leader Imtiaz Jalil AIMIM leader Imtiaz Jalil

AIMIM leader Imtiaz Jalil : छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला

निवडणूक प्रचार सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा प्रकार घडला आहे. एमआयएमचे नेते व माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

निवडणूक प्रचार सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा प्रकार घडला आहे. एमआयएमचे नेते व माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बायजीपुरा परिसरात घडली असून त्यामुळे शहरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रचारादरम्यान काही नाराज कार्यकर्त्यांनी आधी जलील यांना काळे झेंडे दाखवले. त्यानंतर त्यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्जही करण्यात आला.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना इम्तियाज जलील यांनी संयम दाखवला. राजकारणात असे प्रकार होत असतात, असे सांगत लोकशाहीने मिळालेल्या अधिकारानुसार आपण प्रचार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निकालाच्या दिवशी सर्व काही स्पष्ट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, काही कार्यकर्त्यांनी उमेदवार निवडीवर नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक प्रश्न सोडवणारा नगरसेवक न दिल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष असल्याचे त्यांनी सांगितले. याच नाराजीतून विरोध झाल्याचे बोलले जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com