Sanjay Shirsat : "2022 मध्ये आम्हीही हंबरडा फोडला होता, तेव्हापासून...."
Sanjay Shirsat : "2022 मध्ये आम्हीही हंबरडा फोडला होता, तेव्हापासून...." संजय शिरसाटांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीकाSanjay Shirsat : "2022 मध्ये आम्हीही हंबरडा फोडला होता, तेव्हापासून...." संजय शिरसाटांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

Sanjay Shirsat : "2022 मध्ये आम्हीही हंबरडा फोडला होता, तेव्हापासून...." संजय शिरसाटांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Sanjay Shirsat On UBT Shivsena Hambarda Morcha :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट सरकारवर टीका करत शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने मदत जमा करण्याची मागणी केली. मात्र, या मोर्चावर राज्य सरकारमधील मंत्री आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी जोरदार आणि खोचक प्रतिक्रिया दिली असून, उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.

हंबरडा मोर्चावर शिरसाटांची टीका

लातूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले, "हंबरडा मोर्चा पूर्णपणे फेल गेलाय. या मोर्चात एकही शेतकरी नव्हता. केवळ पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते सहभागी होते. शेतकऱ्यांचं दुःख जाणून घेण्यासाठी मोर्चा नव्हता, तर माध्यमांसमोर आपली व्यथा मांडण्याचा हा प्रयत्न होता." शिरसाट पुढे म्हणाले, "ही वेळ शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याची आहे. त्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेण्याची आहे. मोर्चा काढून काय साध्य करायचं आहे? शेतकरी रडतोय, त्याचे फोटो छापून काय साध्य होणार?"

केंद्राकडून अजून मदतीचा प्रयत्न

राज्य सरकारने नुकतेच 31,628 कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले असून, त्याविषयीही शिरसाटांनी भाष्य केलं. "सरकारने घेतलेला निर्णय हा तातडीचा आणि सकारात्मक आहे. मात्र, तरीही आम्ही समाधानी नाही. शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून अजून काही मदत मागवण्याचा आमचा प्रयत्न आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.

"आम्ही 2022 मध्ये हंबरडा फोडला होता, तेव्हापासून हे रडतायत"

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर टीका करताना संजय शिरसाट म्हणाले, "आज जे हंबरडा मोर्चा निघाला, तो शेतकऱ्यांचा नाही, तर ठाकरे गटाचा आहे. आम्ही 2022 मध्ये हंबरडा फोडला होता, तेव्हापासून हे रडतच आहेत. पक्ष फुटला, आमदार, खासदार, पदाधिकारी गेले – त्याचं दुःख अजूनही ते साजरं करत आहेत."

"हे केवळ टीका करत राहिले आहेत. प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही. शेतकऱ्यांचं दुःख सांगण्याऐवजी स्वतःच्या पक्षाचं दु:ख ओरडून सांगण्याचा हा प्रयत्न आहे," असा आरोपही त्यांनी केला.

सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्यावरून सुरू झालेली आरोप-प्रत्यारोपांची मालिका अधिकच तीव्र होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या मोर्चावरून शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या टीकेमुळे राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रश्न ऐरणीवर आहे, तर दुसरीकडे हे मोर्चे आणि विधानं यामुळे राजकीय कुरघोडीचाच प्रयत्न होत असल्याची टीकाही काही जाणकारांकडून होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com