Beed
Beed Beed

Beed : बीडमध्ये वाळू माफियांचा तहसीलदारांच्या पथकावर हल्ला, नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

बीडच्या आष्टी तालुक्यात अवैध वाळू उपशावर कारवाई करून वाहने घेऊन जात असलेल्या तहसीलदारांसह त्यांच्या पथकावर वाळू माफियांनी हल्ला केल्याची घटना घडली. यामध्ये अंगावर जेसीबी घालून एका तलाठ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न देखील झाला
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

बीडच्या आष्टी तालुक्यात अवैध वाळू उपशावर कारवाई करून वाहने घेऊन जात असलेल्या तहसीलदारांसह त्यांच्या पथकावर वाळू माफियांनी हल्ला केल्याची घटना घडली. यामध्ये अंगावर जेसीबी घालून एका तलाठ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न देखील झाला असून या प्रकरणात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.आष्टी तालुक्यातील वाकी येथील सीना नदी पात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती महसूलच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

त्यानुसार त्या ठिकाणी तहसीलदार वैशाली पाटील यांच्यासह पाथकाने कारवाई करत ट्रॅक्टर तसेच जेसीबी ताब्यात घेऊन ते आष्टी शहराकडे येत असताना वाळू माफियांनी त्यांना रस्त्यातच आडवून त्यांच्या ताब्यातील वाहने पळवून नेण्याचा प्रयत्न केला.

याला विरोध करणाऱ्या तलाठी सचिन तेलंग यांच्या अंगावर जेसीबी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. भर रस्त्यावर वाळू माफियांनी अशा पद्धतीने महसूलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याची ही घटना घडली असून या प्रकरणात आष्टी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. गंभीर बाब म्हणजे आठ दिवसापूर्वीच या ठिकाणी अवैध वाळू उपसा करू नका असे म्हणणाऱ्या ग्रामस्थांवर वाळू माफियांनी हल्ला केला होता.. त्यानंतर आता थेट महसूलच्याच पथकावर हल्ला झाल्याने वाळू माफियांची या भागातील दहशत समोर आली आहे.

थोडक्यात

  • बीडमध्ये वाळू माफियांचा तहसीलदारांच्या पथकावर हल्ला

  • तलाठ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न

  • नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com