Chhatrapati Sambhajinagar : गणपती विसर्जनात भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते एकत्र थिरकले; पाहा Viral Video

Chhatrapati Sambhajinagar : गणपती विसर्जनात भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते एकत्र थिरकले; पाहा Viral Video

छत्रपती संभाजी नगरात लाडक्या बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांचा भन्नाट डान्स पाहायला मिळाला आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

आज अनंत चतुर्दशी असून सार्वजनिक गणपतीचे आज विसर्जन करण्यात येईल. यासाठी प्रशासनानेही तयारी पुर्ण केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गणेश विसर्जन साजरे होत आहे आणि अकोला शहरातही गणेश विसर्जन सुरू झाले आहे. छत्रपती संभाजी नगरात बाप्पांची मनोभावे सेवा केल्यानंतर गणपती बाप्पांना अखेर शेवटचा निरोप देण्याची वेळ आली आहे.

छत्रपती संभाजी नगरात लाडक्या बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांचा भन्नाट डान्स पाहायला मिळाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे आणि भाजप आमदार संजय केनेकर हे एकत्रित बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत थिरकताना पाहायला मिळाले आहेत.

शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे आणि भाजपचे संजय केनेकर हे दोघे जुने मित्र आहेत, राजकीय मतभेद बाजूला ठेवून दोन्ही नेत्यांनी गणेश विसर्जनात एकमेकांना वरचढ ठेका दिला. मानाच्या संस्थान गणपतीच्या विसर्जन मिरवणुकी दरम्यान भाजप आणि शिवसेना ठाकरे नेत्यांचा डान्स चर्चेचा विषय ठरला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com