पुण्यात सोसायटीच्या चेंबरमध्ये अडकून दोघांचा मृत्यू; एक बेपत्ता

पुण्यात सोसायटीच्या चेंबरमध्ये अडकून दोघांचा मृत्यू; एक बेपत्ता

पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यात सोसायटीच्या चेंबरमध्ये अडकून दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तर एकजण बेपत्ता झाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यात सोसायटीच्या चेंबरमध्ये अडकून दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तर एकजण बेपत्ता झाला आहे. वाघोलीजवळील मोझे कॉलेज रस्त्याजवळील एका सोसायटीच्या चेंबरमधे 3 कर्मचारी काम करताना अडकल्याची घटना घडली.

चेंबर दुरुस्त करण्यासाठी सकाळी कर्मचारी आले होते. पीएमआरडीए अग्निशमन जवानांनी दोघांना गंभीर अवस्थेत बाहेर काढले आहे. पुणे महागर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ही माहिती देण्यात आली आहे. ही घटना कळताच पीएमआरडीए वाघोली अग्निशमन केंद्राचे जवान घटनास्थळी पोहचले. तिसऱ्या कर्मचाऱ्याचा शोध सुरु आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com