Pune Crime News

Pune Crime News : आधी मेसेज; वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाने उचलल टोकाचं पाऊल

Pune Crime News : वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तरुणाची आत्महत्या; अभ्यासाच्या तणावामुळे घेतले टोकाचे पाऊल.
Published by :
Riddhi Vanne
Published on

पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. वानवडी येथे अभ्यासाच्या तणावाला कंटाळून एम्स रुग्णालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणाने आत्महत्या केली आहे. त्याने स्वतःचा गळा चिरुन आपले जीवन संपवले. उत्कर्ष महादेव शिंगणे (वय १९) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मयत तरुण मूळचा बीडचा आहे.

अभ्यासाच्या तणावाला त्रस्त असलेल्या उत्कर्ष हा डिप्रेशनमध्ये होता. तो त्यावर उपचार घेत होता. पुण्यातील सुरु असलेल्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या क्रीडा महोत्सवाला आला होता. एका वसतीगृहातील एका खोलीतील बाथरूममध्ये सुरीने गळा चिरुन आत्महत्या केली. उत्कर्षने आत्महत्त्या करण्यापुर्वी व्हॉट्सॲपवर सुसाईड नोट लिहिली "अभ्यासाचा तणाव, बदलता अभ्यासक्रम याला वैतागून आत्महत्या करत आहे", असे त्या सुसाईट नोटमध्ये लिहिले आहे. हा नोट आईवडीलांना पाठवून त्याने आत्महत्या केली. सदर प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्याने आत्महत्त्येची नोंद घेतली आहे. प्राथमित तपास असे लक्षात आले की, उत्कर्षने आत्महत्या करणारी सुरी ही ऑनलाईन मागवली होती. पोलिस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com