BJP
BJP BJP

BJP : रत्नागिरीत भाजपला मोठा धक्का, शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे, त्याचवेळी भाजपला एक मोठा धक्का बसला आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे, त्याचवेळी भाजपला एक मोठा धक्का बसला आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आणि ओबीसी शहराध्यक्ष अमित विलणकर यांनी 150 कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे महायुतीला मोठा फटका बसला आहे.

भाजपमधील अंतर्गत संघर्ष आणि आगामी निवडणुकांची उलघाल यामुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत. नारायण राणे यांच्याशी संबंधित भाजपचे दुसरे नेते, माजी नगरसेवक परिमल भोसले यांनी देखील तातडीने राजीनामा दिला आहे.

शिवसेनेला ही संधी मिळाल्याने शहरातील राजकीय घडामोडींना नवा वळण मिळाला आहे. शिवसेनेचे उपनेते बाळ माने यांनी याला महत्त्वाची दिशा दिली आहे. राजकीय घडामोडींत वेगाने बदल होत असल्याने आता महाविकास आघाडी व महायुतीत घडामोडींना वेग आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com