सोलापूर रेल्वे स्थानकात माथेफिरू तरुणीचा धिंगाणा;फर्स्ट क्लास वेटींग रुमच्या काचा फोडल्या

सोलापूर रेल्वे स्थानकात माथेफिरू तरुणीचा धिंगाणा;फर्स्ट क्लास वेटींग रुमच्या काचा फोडल्या

सोलापूर येथे माथेफिरू मुलीने रेल्वे स्टेशनवर शुक्रवारी सकाळी 7:30 च्या दरम्यान धिंगाणा घातल्याने खळबळ उडाली.
Published by :
Siddhi Naringrekar

वसीम अत्तर, सोलापूर

सोलापूर येथे माथेफिरू मुलीने रेल्वे स्टेशनवर शुक्रवारी सकाळी 7:30 च्या दरम्यान धिंगाणा घातल्याने खळबळ उडाली. रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील उच्च श्रेणी वेटिंग रूमची तोडफोड केली. सकाळीच प्रवाशांची लगबग सुरू असतानाच अचानक पणे असे घडल्याने प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण दिसून आले.

अनेकांनी हा व्हिडीओ आपल्या मोबाईल मध्ये चित्रित केला आहे. तरुणीच्या हातात रॉड-लोखंडी सळई सारखी वस्तू असल्याने तिला रोखण्यासाठी जाण्याचे धाडस कुणी केले नाही. तिने उच्च श्रेणी वेटिंग रूमच्या सर्व काचा फोडल्या, आतील खुर्च्यांची तोडफोड केली. काही वेळाने त्या तरुणीला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजले आहे. अद्याप तिचे नाव समजू शकले नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com