Karnataka SSLC Result 2025 : नापास झाला तरी केक कापला

Karnataka SSLC Result 2025 : नापास झाला तरी केक कापला

कर्नाटक SSLC निकाल: नापास विद्यार्थी अभिषेकसाठी पालकांनी केक कापून प्रेरणा दिली.
Published by :
Team Lokshahi
Published on

एसएसएलसी च्या SSLC परीक्षेत खराब कामगिरी केल्याबद्दल मुलाला फटकारण्याऐवजी, एका विद्यार्थ्याच्या पालकांनी पुढील वेळेच्या परीक्षेसाठी प्रोत्साहन दिले. चक्क केक कापून पार्टीचे आयोजन केले. या सेलिब्रेशचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटिझन्स पालकांच्या या विचारशील कृतीचे कौतुक करत आहे.

कर्नाटक बोर्डाचा दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये सहाही विषयात नापास झालेल्या बागलकोटमधील बसवेश्वर इंग्रजी माध्यम शाळेतील अभिषेक चोलाचगड्डा या विद्यार्थ्यांच्या पालकांनी केक कापून हा आनंद साजरा केला. अभिषेकचे वडील यल्लप्पा चोलाचगड्डा हे व्यवसायाने छायाचित्रकार आहेत, म्हणाले की, "निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलाला सात्वंन देण्यासाठी केक कापण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता."

अभिषेकने दहावीच्या परीक्षेत एकूण 32 टक्के मिळवले म्हणून त्याच्या केकवर 32 अंकाची डिझाइन काढली होती. घरातल्यांनी केक खावू घातला आणि पुढील आयुष्यासाठी प्रोत्साहन दिले. यावर उत्तर देताना अभिषेक म्हणाला, "मी नापास झालो तरी माझ्या घरच्यांनी मला प्रोत्साहन दिले. "मी पुन्हा परीक्षा देईन आणि पास होईन आणि आयुष्यात यश मिळवेन."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com