PM Kisan Scheme: नव वर्षात 'पीएम किसान' योजनेत नवे नियम लागू! काय आहेत जाणून घ्या...

PM Kisan Scheme: नव वर्षात 'पीएम किसान' योजनेत नवे नियम लागू! काय आहेत जाणून घ्या...

पीएम किसान योजनेत नव्या वर्षात नवे नियम लागू करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना कोणते बदल जाणून घ्या आणि त्याचा कसा फायदा होईल याबद्दल माहिती मिळवा.
Published by :
Prachi Nate
Published on

पीएम किसान योजनेत नववर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच जानेवारी पासून नवीन नियम लागू होणार आहे. नवीन नियम असा आहे की, जर तुम्ही शेती करत असला आणि जमीन तुमच्या नावावर नसून ती तुमच्या आजोबा किंवा पंजोबांच्या नावावर असेल किंवा इतर कोणाच्या नावावर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि हा नियम जानेवारीपासून लागू होणार आहे.

यामगचं कारण असं की, बिहारमध्ये जवळपास 30 ते 40 टक्के शेतकरी आहेत ज्यांच्या जमिनी त्यांच्या पूर्वजांच्या नावावर आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत येण्याची शकतात असून नवीन नियमांमुळे हे शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. ही समस्या लक्षात घेऊन सरकारने काही जिल्ह्यांमध्ये पथदर्शी प्रकल्प सुरू केला आहे.

याअंतर्गत शेतकऱ्यांची नवीन नोंदणी करण्यात येत आहे. हा प्रकल्प गया, पूर्णिया, भागलपूर, पूर्व चंपारण आणि सारण जिल्ह्यातील 10 गावांमध्ये सुरू आहे. या गावांमध्ये शेतकऱ्यांची निवड केली जात आहे. या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी त्यांची नवीन नोंदणी करण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com