येणाऱ्या 10 वर्षात मुस्लिमांचा पंतप्रधान होईल- कालीचरण महाराजांचे अमरावतीमध्ये खळबळजनक वक्तव्य

येणाऱ्या 10 वर्षात मुस्लिमांचा पंतप्रधान होईल- कालीचरण महाराजांचे अमरावतीमध्ये खळबळजनक वक्तव्य

येणाऱ्या 10 वर्षात मुस्लिमांचा पंतप्रधान होईल- कालीचरण महाराजांचे अमरावतीमध्ये खळबळजनक वक्तव्य
Published by :
Siddhi Naringrekar

सूरज दहाट, अमरावती

येणाऱ्या 10 वर्षात मुस्लिमांचा पंतप्रधान होईल असे वक्तव्य कालीचरण महाराजांनी अमरावतीमध्ये केलं आहे. कालीचरण महाराज म्हणाले की, 60% आपल्या महिला मतदानाला जात नाही.त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्ही मुस्लिम महिला व्हाल.आपलं राहंणीमान आणि मुस्लिमांच राहणीमान यात जमीन आसमानचा फरक आहे. देशात 140 करोड जनता आहे, त्यामध्ये 94 करोड हिंदू आहे,तर 46 करोड हे मुस्लिम आहे.

त्यामुळे येणारा दहा वर्षात त्यांचा पंतप्रधान होईल. महिलांना बुरख्यात राहावं लागेल असे वक्तव्य कालीचरण महाराज यांनी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने अमरावतीच्या नांदगाव पेठ येथे शौर्य यात्रेचा आयोजन करण्यात आलं होत त्यावेळी केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com