Admin
बातम्या
पुण्यासह पिंपरी चिंचवड मध्ये आयकर विभागाचे छापे
पुण्यासह पिंपरी चिंचवड मध्ये आयकर विभागाचे छापे टाकण्यात आले आहे.
चंद्रशेखर भांगे, पुणे
पुण्यासह पिंपरी चिंचवड मध्ये आयकर विभागाचे छापे टाकण्यात आले आहे. पुणे परिसरातील पिंपरी आणि औंध परिसरात आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे.
आयकर विभागाचे अधिकारी बांधकाम व्यावसायिकांच्या निवासस्थानी पोहचले आहेत आणि कागदपत्रांची तपासणी सुरु केली आहे.पुण्यातील सिंध सोसायटीत आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. सिंध सोसायटीत राहणाऱ्या तीन बांधकाम व्यावसायिकांवर छापेमारी केली जात आहे.
या कारवाईत बांधकाम व्यावसायिकांना रडारवर होते. पुणे येथील अधिकाऱ्यांचे पथक ही कारवाई करत आहे. पुण्यातील ३ प्रसिद्ध बिल्डर यांच्या कार्यालय आणि घरांवर आयकर विभागाचे छापे पडले आहे.