आयकर विभागाकडून सायन, बोरिवलीतील झोपड्यांवर छापे

आयकर विभागाकडून सायन, बोरिवलीतील झोपड्यांवर छापे

राज्यात सध्या आयकर विभागाकडून जोरदार कारवाई सुरु करण्यात आली आहे. आज मुंबईतील सायन आणि बोरिवली परिसरात आयकर विभागाने छापेमारी केली.
Published by :
Siddhi Naringrekar

राज्यात सध्या आयकर विभागाकडून जोरदार कारवाई सुरु करण्यात आली आहे. आज मुंबईतील सायन आणि बोरिवली परिसरात आयकर विभागाने छापेमारी केली. ही छापेमारी झोपडपट्टी भागात केली असल्याची माहिती आहे. देशभरात 205 ठिकाणी आणि राजकीय पक्षांच्या कार्यालयावर छापे मारण्यात आले होते. याचा वापर करचोरीसाठी करण्यात येत होता. मुंबई आणि गुजरातमधील काही राजकीय पक्षांना मिळालेला निधी हा 2000 कोटींहून अधिक असू शकतो. गुजरातमध्ये 21 राजकीय पक्षांवर छापेमारी करण्यात आली होती. यासाठी मुंबईहून 120 आयकर अधिकाऱ्यांचे पथक गुजरातमध्ये पाठवण्यात आले होते.

झोपडपट्टीमध्ये छापा मारलेले ठिकाण हे राजकीय पक्षाचे कार्यालय आहे. हा राजकीय पक्ष नोंदणीकृत असला तरी निवडणूक आयोगाची मान्यता नाही. पक्षनिधीच्या नावाखाली करचोरीचा प्रकार आयकर विभागाने उघडकीस आणला आहे. देशभरात अशी कारवाई सुरू आहे. 100 चौफूट असलेल्या झोपडीवर एका पक्षाचे नोंदणीकृत कार्यालय आहे. बँक रेकॉर्डनुसार, या पक्षाला मागील दोन वर्षात 100 कोटींची देणगी मिळाली होती. हा राजकीय पक्ष नोंदणीकृत असला तरी त्याला निवडणूक आयोगाची परवानगी नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com